Loading...

पूरग्रस्तांसाठी सचिन तेंडुलकरची मोठी मदत, जनतेला केलं हे आवाहन

मुंबई |  सांगली कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेपाठोपाठ क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडूलकर देखील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे. सचिन तेंडूलकरने पंतप्रधान मदत निधीतून आर्थिक सहाय्य केलं आहे.

देशभरात आलेल्या महापुराने विनाश ओढवला आहे. पाणीपातळी कमी होत असताना पूरग्रस्त राज्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी मी पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत केली आहे, असं ट्वीट सचिनने केलं आहे.

Loading...

सचिन तेंडुलकरने मदत केल्यानंतर इतरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. एनडीआरएफच्या जवानांपासून अनेक जण पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे फोटो सचिनने ट्वीट केले आहेत.

दरम्यान, सगळीकडून मदतीचा ओघ सुरू असताना बॉलिवूडचे काही मोजके अपवाद वगळता बाकीच्यांनी मदतीसाठीचा हात आखडता घेतला आहे.

Loading...

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“तो पराभव मी कधीही विसरू शकत नाही”

-चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास!

-काश्मिरच्या लाल चौकात अमित शहा फडकवणार तिरंगा!

-शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती- रामदास फुटाणे

-राट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्त भागात स्वातंत्र्यदिन साजरा करणार

Loading...