बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अडचणीच्या काळात सचिन तेंडूलकरनं मला मदत केली – विराट कोहली

लंडन | सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्याची मालिका खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. मोहम्मद शमी आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली आहे. या सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने 2014च्या इंग्लंड दौऱ्याच्या आठवणीला उजाळा दिला आहे.

2014 साली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. यात भारताने कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं होतं. त्यानं या मालिकेतील 10 इंनिंगमध्ये 13.50 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच्या खराब कामगिरीवर चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर विराटने क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा सल्ला घेतला.

ऑस्ट्रेलियापुर्वीचा प्रत्येक दौरा मला इंजिनियरिंगच्या परीक्षेप्रमाणे वाटत होता. त्यावेळी मी थोडासा निराश होतो. माझ्यासोबत कोण आहे आणि कोण नाही हे मला तेव्हा समजलं. मी मुंबईत गेलो. सचिन तेंडूलकरांना फोन केला. माझ्यात सुधारणाकरण्यासाठी काय केलं पाहिजे असं त्यांना विचारलं. त्यानंतर त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला, असं विराट कोहलीनं सांगितलं आहे. दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीत विराटने हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल जाॅन्सन त्यावेळी फाॅर्ममध्ये होता. त्याच्या गोलंदाजीची मी पुर्ण तयारी केली. जीममध्ये प्रत्येक ठिकाणी मी त्याच्या गोलंदाजीचा विचार करत असे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची माझ्या मनातून भिती गेली, असं देखील विराटने मुलाखतीत म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून संपले, हा या देशाचा इतिहास”

“जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय”

कपिल शर्मावर भडकला अक्षय कुमार, म्हणाला…

पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांनाच पडली मदतीची गरज, पाहा व्हिडीओ

वाढदिवसाच्या नावाखाली केकची नासाडी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More