मुंबई | सध्या राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर बाॅलिवूडच्या कलाकारांसोबतच आता क्रिकेटपटूंनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याला आता कोरोनाची लागण झाली आहे. सचिन तेंडूलकरने स्वतः ट्विट करत याबद्दची माहिती दिली आहे.
सौम्य लक्षण दिसल्यानंतर मी स्वतः जाऊन कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. माझी चाचणी पाॅसिटिव्ह आली आहे. तर बाकी घरच्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केलं आहे आणि डाॅक्टरांच्या सल्याप्रमाणे सर्व खबरदारी घेत आहे, असं ट्विट सचिनने केलं आहे.
सचिनने त्याबरोबर आरोग्य सेवक आणि डाॅक्टरांचे आभार मानले आहेत. तर त्याने देशातल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे. याआधी नुकताच सचिनच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजंडने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज जिंकली होती. रायपूरमध्ये ही मालिका खेळवण्यात आली होती.
दरम्यान, या सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू सहभागी होते. युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग, इरफान पठान, युसूफ पठान यांसारखे भारतीय खेळाडू तर इतर देशांचे वरिष्ठ खेळाडू या मालिकेत सहभागी झाले होते.
पाहा ट्विट-
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
थोडक्यात बातम्या-
टीव्हीवर सामन्याचे प्रक्षेपण दोन ते अडीच सेकंड लेट, मग बुकींनी डोंगरच गाठला थेट!
अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण!
‘…तर मग मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?’; ‘या’ शिवसेना खासदाराची मोदींवर बोचरी टीका
“नरेेंद्र मोदीजी अजून किती फेकणार, आता हद्द झाली राव”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.