खेळ

“कॅन्सरवर मात केल्यानंतर मला कमबॅक करण्यासाठी सचिनचा ‘तो’ सल्ला मोलाचा ठरला”

मुंबई | युवराज सिंगचं नाव घेतलं की लोकांना त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसोबत लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर त्याने केलेली मात. तीन केमोथेरेपीनंतर युवराजने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केली. कॅन्सरसारख्या आजारावर मात केल्यानंतर पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मार्ग दाखवला असल्याचं युवराजने सांगितलं आहे.

कॅन्सरवर मात केल्यानंतर युवराज पुन्हा क्रिकेट खेळू शकेल की नाही याबाबत शंका होती. युवराजचा स्वत:चा देखील आत्मविश्वास कमी झाला होता. अशा वेळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचा आत्मविश्वास वाढवला. युवराजने एका मुलाखतीत याबाबत सांगितलं आहे.

युवराजला भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याआधी देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आपली लय सिद्ध करण्यास सांगण्यात आलेलं. यावेळी सचिन तेंडुलकरने युवराजला एक मोलाचा संदेश दिला. युवराज सांगतो “आपण क्रिकेट का खेळतो? हे कायम लक्षात ठेव. क्रिकेटमागचं मूळ कारण असतं ते क्रिकेटवरील प्रेम. जर तुझं खेळावर प्रेम असेल तर खेळलंच पाहिजे. मी जर तुझ्याजागेवर असतो तर काय केलं असतं माहित नाही, पण जर तू खेळावर प्रेम करत असशील तर तू खेळत राहायला हवंस. तू किती खेळायचं हे पण तूच ठरवायला हवंस. तुझ्या निवृत्तीचा निर्णय लोकांनी घेता कामा नये.”

मी सचिनशी कायम चर्चा करत असायचो. मी कमबॅकनंतर 3-4 वर्षे क्रिकेट खेळलो. त्यावेळी भारतीय संघात माझं स्थान पक्क नव्हतं. मी 2014 आणि 2017चा टी-20 वर्ल्डकप खेळलो. पण खेळताना मलाच समजलं की माझं शरीर आता तितकं तंदुरूस्त नाही. जिद्दीच्या जोरावर मी त्या काळात वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी केली. पण नंतर मी निवृत्ती घेण्याचा विचार केला, असं युवराजने सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन

“राणेंवर बोलल्याशिवाय ‘मातोश्री’ बिस्कीट टाकत नाही”

कौतुकास्पद! भारताच्या लेकींनी शोधला मंगळाच्या कक्षात फिरणारा नवा ‘लघूग्रह’

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार निकाल

“नरेंद्र मोदींनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधातील आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या