Top News खेळ

सचिनच्या मुलाचं काय होणार?; गुरुवारी होणार महत्त्वाचा फैसला

Photo Courtesy- Facebook/Sachin Tendulkar

चेन्नई | भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आयपीएलच्या लिलावात समावेश करण्यात आला आहे. अर्जुन तेंडुलकरच्या करिअरचं काय होणार?, यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं मानलं जात आहे.

18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता यंदाच्या आयपीएलसाठी महत्त्वाची बोली लागणार आहे. अर्जुन तेंडुलकरसाठी कोणता संघ बोली लावणार याकडे साऱ्या क्रिकेट वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईज सर्वात कमी ठेवण्यात आली आहे. 20 लाख रुपये बेस प्राईज गटात त्याला सामील करण्यात आलं आहे.

सचिन तेंडुलकर मेंटॉर असलेला मुंबई इंडियन्स संघ अर्जुनसाठी बोली लावू शकतो, असं मानलं जात आहे, मात्र इतरही संघांना त्याच्यात रस असल्यास तेही अर्जुनला आपल्या संघात खेचण्यासाठी प्रयत्न करु शकतात. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर कोणत्या संघाकडून आयपीएल खेळणार की त्याच्यावर कुणीही बोली लावणार नाही?, हे आज दुपारीच स्पष्ट होऊ शकेल. जर अर्जुनवर कुणीही बोली लावली नाही तर एखादा संघ त्याला त्याच्या बेस प्राईजवर आपल्या संघात सहभागी करुन घेऊ शकतो.

यावेळी होणाऱ्या लिलावासाठी तब्बल हजारच्यावर खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद केली होती, मात्र यातील फक्त 292 खेळाडूंच्या नावावरच बोली लागणार आहे. आठ फ्रॅन्चायसींना मिळून यातील फक्त 61 खेळाडूंना आपल्या संघांमध्ये घेता येणार आहे. त्यामुळे या बोलीकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग तसेच केदार जाधव ही भारताची काही मोठी नावं या लिलावात सहभागी असतील. तर परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्वीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे. या खेळाडूंना दोन कोटी रुपयांच्या किंमतीच्या बेस प्राइज गटात ठेवण्यात आलं आहे.

मॅक्सवेल आणि स्मिथ यांच्यासोबतच शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्ज, लियाम प्लन्केट, जेसन रॉय आणि मार्क वुड या खेळाडूंना सर्वाधिक किंमतीच्या बेस प्राइज गटात ठेवण्यात आलेलं आहे. यातील काही नावांकडे बऱ्याच फ्रॅच्यायशींचं लक्ष असून कुणावर किती बोली लागणार याची उत्सुकता आहे.

दीड कोटी रुपयांच्या आधार मूल्याच्या वर्गात तब्बल 12 खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तर दुसरीकडे भारतीय फलंदाज हनुमा विहारी आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना एक कोटी रुपयांच्या तिसऱ्या वर्गात स्थान मिळालं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ गावात सरपंच झाला की माणूस मरतोच म्हणायचे; महिलेनं घेतला धाडसी निर्णय!

शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!

पोलिसांची धडक कारवाई, 10 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या!

गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

‘इथलेच काय इंटरनॅशनल डॉनही मला ओळखतात, घाबरायचं नाही’; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या