बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून विराटने दिलेलं ‘ते’ खास गिफ्ट सचिन तेंडुलकरने परत केलं

नवी दिल्ली | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अनेक चाहते आहेत. सचिनच्या चाहत्यांच्या यादीत विराट कोहलीचा देखील नंबर लागतो. त्यामुळेच विराटने त्याची एक खास गोष्ट सचिनला देऊ केली होती. मात्र सचिनने ती विराट कोहलीला परत केली आणि याचा खुलासा खुद्द सचिननेच केला आहे.

ग्रॅहम बेसिंगरने सचिन तेंडुलकरची एक खास मुलाखत घेतली. यावेळी विराट बद्दल बोलताना सचिने काही जुन्या आठवणी सांगितल्या. निवृत्तीच्या दिवशी भावून झाल्यानंतर सचिन एका कोपऱ्यात बसून डोळ्यातील अश्रू पुसत होता. त्यावेळी विराट तिथे आला आणि त्याने त्याच्या हातातील वडिलांनी दिलेला एक पवित्र धागा सचिनला दिला होता.

हा धागा सचिनने काही वेळ त्याच्याकडे ठेवला पण नंतर विराटची ही खास गोष्ट त्याला परत करून टाकली. यावेळी ‘ही एक अमूल्य गोष्ट आहे ज्याच्यावर तुझा हक्क आहे. ही खास गोष्ट तुझ्याकडेच असायला हवी’, असं म्हणत सचिनने तो धागा विराटला परत केला.

दरम्यान, हा एक खूप भावनिक क्षण असल्याचंही सचिनने मुलाखतीत सांगितलं. ग्रॅहम बेसिंगरन सोबत गप्पा मारताना सचिनने विराटचं तोंडभरून कौतुक देखील केलं.

थोडक्यात बातम्या-

“मी यादी काढली तर सरकार अडचणीत येईल, तुम्हाला वाटत असेल…”

“षंढ सरकारची षंढ यंत्रणा, हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा”

“आमंत्रण नसताना बिर्याणी खायला जाऊन परराष्ट्रीय धोरण सुधारत नाही”

रशिया-युक्रेनवर युद्धाचे ढग; युद्ध झालं तर भारताला चुकवावी लागेल ही किंमत

“सोमय्या स्वत:च्या चपलेनं स्वत:लाच मारणार, लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More