Top News देश महाराष्ट्र मुंबई

शेतकरी आंदोलन : सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्विटनं एकच खळबळ

मुंबई | भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे, मात्र असं असलं तरी भारतातील काही सेलिब्रेटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या भूमिकेनंही खळबळ उडाली आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होऊ शकत नाही. बाह्य शक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात, मात्र त्यात हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहीत आहे त्यांनी भारतासंदर्भात निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट होऊया, असं ट्विट सचिननं केलं आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं असून अनेक देशांमधून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.

पॉपस्टार रिहाना आणि त्यानंतर पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र सचिनने अशाप्रकारे मिळणाऱ्या समर्थनाला बाह्य शक्ती म्हणून या प्रकरणाला वेगळं वळण दिल्याचं दिसतंय. यामुळे सचिनला रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

 

थो़डक्यात बातम्या-

मी राज्यपाल नाही, तर…- भगतसिंह कोश्यारी

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी मिया खलिफा नेमकी कोण आहे?, पाहा फोटोमला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

करुणा धनंजय मुंडेंचा तक्रार अर्ज आला समोर; केलेत ‘हे’ 6 धक्कादायक आरोप

धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?- तृप्ती देसाई

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या