महाराष्ट्र मुंबई

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

मुंबई | भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांवर काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी वर्णद्वेषी टीका केली. याप्रकरणावरुन जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांचं मत मांडलं आहे.

सचिन तेंडुलकरनेदेखील या प्रकरणावरुन एक संदेश दिला आहे.  खेळ सर्वांना जोडतो, लोकांना एकमेकांपासून वेगळं करत नाही, असं सचिनने म्हटलंय. सचिनने या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

क्रिकेट कधीही कोणत्याही खेळाडूसोबत भेदभाव करत नाही. बॅट आणि बॉलला माहीत आसतं की ते ज्याच्या हातात आहेत तो किती प्रतिभावान आहे. बॅटला आणि बॉलला हे माहीत नसतं की त्याचा रंग, त्याचा वर्ण, धर्म किंवा त्याचा देश कोणता आहे. ज्या लोकांना हे कळत नाही, असा लोकांसाठी खेळाच्या मैदानात कोणतीही जागा नाही, असं सचिन म्हणाला.

सर्व आरोपींची स्टेडियमधील सुरक्षा अधिकारी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्याअधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच लागोपाठ दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी भारतीय खेळाडूंची माफी मागितली आहे.

 


थोडक्यात बातम्या-

राज्यावर बर्ड फ्लूचं सावट?; लातूर तसंच बीडमध्ये पक्षी-कोंबड्यांचा मृत्यू

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, परभणीत 800 कोंबड्यांचा मृत्यू

“खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही”

‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला

धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या