बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | सध्या मुंबई क्रुझ प्रकरण चांगलंच चिघळत चाललं आहे. शनिवारी रात्री एनसीबीनं रेव्ह पार्टीत ड्रग्स घेणाऱ्यांवर कारवाई करत अटक केली आहे. या छाप्यात 12 जणांना अटक करण्यात आली असून त्यांमध्ये 9 पुरुष आहे तर 3 मुलींचा समावेश आहे. अशातच आता याप्रकऱणाविषयी एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ड्रग्स प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, आर्यन खानवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्याला अटकही करण्यात आलं नाही.

आर्यन खान, मुनमून धमेचा, इस्मीत सिंग, विक्रम छोकेर, अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल या सगळ्यांची सध्या क्रुझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणी चौकशी सुरु असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं.

दरम्यान, सध्या समीर वानखेडे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव पहायला मिळत आहे. आतापर्यंत समीर वानखेडे यांनी बऱ्याच बड्या कलाकारांच्या घरावर धाड टाकली आहे.

थोडक्यात बातम्या –  

शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी- संजय राऊत

“जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचाचं असतो”

महाविकास आघाडीमुळं मोठा त्रास, शिवसेना सोडताना ‘हा’ नेता रडला!

देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव; भाजपकडून शिवसेना नेत्याला विधानसभेची उमेदवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More