बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंना दिलासा नाहीच; पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

मुंबई | अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडातील मुख्य संशयित सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांची कोठडी आज संपल्याने त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी वाझेंचे वकील आणि एनआयएच्या वकिलांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने एनआयएच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहून वाझेंच्या कोठडीत पाच दिवसाने वाढ केली आहे.

वाझेंना आणखी काळ कोठडीत ठेवणं अन्यायकारक होईल, असं वाझेंच्या वकिलांनी सांगितलं. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझे यांची कोठडी महत्त्वाची असल्याचं सांगितलं.

वाझेंनी बरेच आरोप कबुल केल्याचं एनआयएने गेल्या सुनावणीवेळी सांगितलं होतं. मात्र, आज वाझेंनी आपण कोणतीच कबुली दिली नसल्याचं सांगत एनआयएला कोर्टात तोंडावर पाडलं आहे.

वाझेंना न्यायालयात लेखी माहिती द्यायची आहे. तुमच्या उपस्थितीत वाझेंना निवेदन लिहून द्यायचे आहे, असं वाझेंच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. त्यावर तुमच्या अशिलाला जे काही सांगायचे आहे, म्हणायचे आहे. ते त्यांनी कोर्टाच्या नियमानुसारच सांगावं. आपले निवेदन लिहून न्यायालयात सादर करावे, असं न्यायाधीशांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी; ‘या’ देशात 7 जणांचा मृत्यू

राखी सावंत पुन्हा बांधणार लग्नगाठ, ‘या’ व्यक्तीसोबत लग्न करणार असल्याचं केलं जाहीर

“एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?, हा तर धक्कादायक विनोद”

‘आयपीएल’आधी दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का; ‘हा’ मोठा खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह

तीन गुप्तांगासोबत जन्माला आलं बाळ, डॉक्टर देखील झाले हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More