बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! सचिन वाझेंची ‘या’ विभागात करण्यात आली बदली

मुंबई | मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणानंतर पोलिस अधिकारी सचिन वाझे चर्चेत आले. त्यांच्यावर विरोधकांनी या प्रकरणासंबंधी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणामुळे राज्याच्या विधानसभेत देखील गदारोळ झाला होता. भाजपने सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी सभागृहात उचलून धरली होती. यावर कारवाई करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची बदली केली जाईल, अशी घोषणा केली होती.

सचिन वाझे यांची बदली मुंबईच्या सीएफसी म्हणजेच नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फाॅसिलीटीझन सेंटर) मध्ये करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री पोलिस मुख्यालयातून यासंबंधी अधिकृत पत्रक काढण्यात आलं आहे. शुक्रवारी ते आपल्या पदाचा कार्यभार संभाळतील. याआधी मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात एटीएसने सचिन वाझे यांची 10 तास चौकशी केली होती.

एटीएसच्या चौकशी दरम्यान वाझेंवर करण्यात आलेल्या आरोपांचे त्यांनी खंडण केलं असल्याची माहिती समोर येत आहे. मी ती स्काॅर्पीओ वापरली नाही, अशी माहिती त्यांनी एटीएसला दिली आहे. तर वाझे स्वतःहून या चौकशीला गेले होते, अशी माहिती देखील समोर येत आहे.

दरम्यान, एन्कांऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे 2020 मध्ये मुंबईच्या क्राईम ब्राँचमध्ये कार्यरत होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली कार सापडल्याने हे प्रकरण सूरू झालं होतं.

थोडक्यात बातम्या-

“नरेंद्र मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात, अश्रूंचा बांध फुटतो, ते बरं चालतं”

मोठी बातमी! ‘या’ तारखेला होणार MPSC ची परिक्षा

“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली, संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा

“पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको”

रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More