बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंबानींच्या घरासमोर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझे?; ‘फॉरेन्सिक पोडियाट्री’द्वारे होणार तपास!

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीबाबतचा तपास आता त्या 49 सेकंदाच्या व्हीडीओभोवती सुरु आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घालून चालताना दिसून येत आहे. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून सचिन वाझेच असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’ला आहे.

पीपीई किट घातलेली ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा ‘एनआयए’ला दाट संशय आहे. त्यामुळे आता ‘एनआयए’चे अधिकारी सचिन वाझे यांना पीपीई किट परिधान करुन चालायला लावणार आहेत. त्यांच्या हालचालीवरुन ती व्यक्ती सचिन वाझेच होती का? याचा शोध ‘एनआयए’चे अधिकारी घेतील. त्यामुळे आता या सगळ्यातून काय निष्कर्ष पुढे येतील, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज तपासयंत्रणांच्या हाती लागले होते. त्यात 25 फेब्रुवारीच्या रात्री अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ एक स्कॉर्पिओ येऊन थांबल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या स्कॉर्पिओसोबत एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही दिसत होती. ही इनोव्हा कार अनेकदा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसून आली होती. एकदा या इनोव्हा कारमधील ड्रायव्हर बाहेर उतरला होता. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते.

दरम्यान, ‘फॉरेन्सिक पोडियाट्री’चा वापर करुन अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास केला जातो. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे पाय, पायाचे ठसे, चालण्याची पद्धत याचं निरीक्षण केलं जातं. इतकच नाही तर पायाचं मोजमाप, रचना यावरुन आरोपीची ओळख पटवली जाऊ शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘तो येऊन जबाब देऊन गेला, पण महाविकास आघाडी सरकारने काय केलं?’; फडणवीसांचा सरकारवर घणाघात!

‘…पण एका मंत्र्याची विकेट पडणार’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान!

बुमराहला शुभेच्छा देणं मयंक अग्रवालला पडलं महागात, वाचा नेमकं काय झालं…

पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

अरे बापरे! बादलीभर ‘बिअर’ काही सेकंदात फस्त, पाहा आश्चर्यचकित करणारा हा व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More