बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

मुंबई | API सचिन वाझे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आलं आहे. रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे एनआयएच्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं.

एनआयएच्या कार्यालयात उपचार करणं शक्य नसल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याचं समजतंय. यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती.

एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहिती आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सध्या अडचणीत आलेले सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन

रेल्वेच्या पुलावर मुलं उभी होती, तेवढ्यात अचानक मालगाडी आली अन्…. पाहा व्हिडिओ!

गंगुबाईच्या लुकनंतर आलियाचा ‘हा’ लुक होतोय प्रचंड व्हायरल; पाहा आलियाचा नवीन लुक

महागाईचा कहर! आता खाद्यतेलाच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्यांनी वाढल्या

भाजपच्या या आमदाराने योगी आदित्यनाथांसोबत केली छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना; म्हणाले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More