बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब; अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर केला गंभीर आरोप

मुंबई | काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली होती. आता सचिन वाझेंनीही एक लेटरबॉम्ब टाकला आहे. वाझे यांनी या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये वाझेंनी आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा केला आहे.

सेवेत आल्यानंतर मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझे यांच्या पत्रात करण्यात आल्याचं कळतंय.

ऑक्टोबर 2020 मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावलं होतं आणि मुंबई शहरातील 1 हजार 650 बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितलं होतं. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचं सांगत आपण त्यास नकार दिला होता, असा खुलासा सचिन वाझेंनी पत्रातून केला आहे.

थोडक्यात बातम्या-

पैशांच्या अडचणीमुळे वडिलांनी चक्क आपल्या मुलीलाच विकलं अन्…

कोरोना संकटातून वाचण्यासाठी पुणे प्रशासनानं लष्कराकडे केली ‘ही’ मागणी!

भाऊंचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ, पाहाल तर खळखळून हसाल

पत्रकाराचं अपहरण करून निर्घृण हत्या; अहमदनगरच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला

धक्कायदायक! लॉकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मारायला लावल्या 300 दंड बैठका; तरूणाचा जागीच मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More