शरद पवार की बाळासाहेब… राजकारणातील आदर्श कोण?; सचिन अहिर म्हणतात…

मुंबई | राष्ट्रवादीचे मुंबई शहराध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरूवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर ते आज माध्यमांशी बोलत होते.

राजकारणातील आदर्श कोण? शरद पवार की बाळासाहेब ठाकरे, असा प्रश्न सचिन अहिर यांना विचारण्यात आला होता. यालाच उत्तर देत शरद पवारच माझे राजकारणातील आदर्श आहेत, असं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.

पवार साहेब कुठं भेटले तर हात जोडून मी त्यांची माफी मागेल आणि तेही मला हसून माफ करतील, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.

शरद पवार कायम माझ्या हृदयात असतील आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत कालही होता, आजही आहे, असं अहिर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणतात…

-नेत्यांच्या भरवशावर बसू नका; अण्णा हजारेंचा दिपाली सय्यद यांना सल्ला

-शाहरूख खानचा मुलगा करतोय ‘या’ मुलीला डेट?

-काँग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री पुन्हा अडचणीत; भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा दाखल!

-साहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही; म्हणून जिथे आहात तिथेच रहा!