बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंकजाताई, ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही”

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून चार नेत्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

डॉ. भागवत कराड हे ओबीसी नेते आहेत. त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे ते मराठवाड्यातील आहेत. तरीही मुंडे भगिनींनी कुणाचेच अभिनंदन न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशात ओबीसी समाजाची जनगणना करा ही मागणी केल्यामुळे आपल्याला मंत्रिपद दिलं नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

24 जानेवारीला केंद्र सरकारकडे मागणी केलीत की आम्हीही देशाचे आहोत, ओबीसी समाजाची जनगणना करा. ही मागणी केल्यामुळे आपल्याला मंत्रिपद दिले नाही असं दिसत आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

आदरणीय पंकजाताई मुंडे, आपण ज्या भारतीय जनता पक्षात काम करत आहात, त्याच भाजपने मंडल आयोगाला विरोध केला होता. कालकथित गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते. मुंडे साहेब सतत ओबीसी समाजाचे प्रश्न संसदेत मांडायचे, याची आठवण आपण भाजपला करुन दिली, असंही सचिन खरात म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

“पाकिस्तानात 58 रूपये लीटर पेट्रोल असताना भारतात 106 रूपये का ?”

“संजय राऊत तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?”

संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा, अन्यथा…- चित्रा वाघ

“काढ्या आणि योगामुळे देशात कोरोनाची लाट आटोक्यात आली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More