बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा दिला होता का?”

मुंबई | पोलीस दलातील अधिकाऱ्यानं पत्र लिहून खदखद व्यक्त केल्याची घटना देशात पहिल्यांदा घडलेली नाही. 2002 मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शहा पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का?, असा सवाल करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलंच फटकारलं आहे.

वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असा सवाल सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना केला आहे. तसेच साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग आहे, अशी बोचरी टीकाही सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त पदावरून दूर झालेले परमबीर सिंह पत्र लिहिणार याची भाजप नेत्यांना कल्पना होती. त्यांना सगळं आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळेच तर पत्र बाहेर येताच फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, असं सचिन सावंत यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सरकारच्या निर्मात्यांना सरकारची बाजू घ्यावीच लागते- देवेंद्र फडणवीस

“साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग”

लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका; स्वत: ठोकर खाल्लेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा? शरद पवारांचा गौप्यस्फोट

‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, मित्राला वाचवण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More