बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत”

मुंबई | फडणवीसांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपचं पाप आहे. फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत, अशी टीका काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सत्ता मिळाल्यावर चार महिन्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवेन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही अधिक शक्तीशाली झाले आहेत का?, असा सवाल सचिन सावंत यांनी केलाय.

फडणवीस सरकारच्याच काळात उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठाने आरक्षणाला स्थगिती दिली. प्रशासकांची नियुक्ती ही फडणवीस सरकारनेच केली. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात 31 जुलै 2019 ला काढलेला अध्यादेश फडणवीस सरकारच्या काळातच काढला गेला. या अध्यादेशाच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी दलित आदिवासी व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात आहे, तिथे इतर मागासवर्गीय समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.

प्रशासकीय स्तरावर देखील जनगणना माहितीच्या संदर्भात जनगणना विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. भाजप नेत्यांनी राज्यातील भाजप सरकारतर्फे विनंती करूनही केंद्रातील भाजप सरकारने गेले 2 वर्षे सदर माहिती दिलेली नाही. ही वस्तुस्थिती असताना भाजप आपले पाप महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची कोणतीही चूक नसतानाही भाजपतर्फे चाललेले आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, ‘या’ अभिनेत्रीनं मुलीला दिला होता सल्ला

“वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो”; भरसभेत वडेट्टीवारांचा शिवसेनेवर घणाघात

“…तर प्रीतम मुंडे खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतायत हे सिद्ध होईल”

नागरिकांनो सावधान! आज देखील महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More