महाराष्ट्र मुंबई

“मुस्लिमद्वेषातून देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाला विरोध”

Loading...

मुंबई | धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकंच नाही तर धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिल्याने मराठी आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या याच वक्तव्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे.

मुस्लिम समाजातील 50 उपजातींना 5 टक्के आरक्षण देण्याचा आघाडी सरकारने निर्णय घेतला होता. यावर उच्च न्यायालयानेच शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाजाला आरक्षण देणे आवश्यक आहे. म्हणून फडणवीस यांनी या निर्णयाला दाखवलेली भीती हा पोटशूळ आहे. त्यात केवळ मुस्लिम द्वेष आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेची सहमती आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पण बाबासाहेबांच्या घटनेनुसार धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, मुस्लीम आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढून कायदा करु आणि निर्णय घेऊ, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलंय.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

नगरसेवक पद रद्द केल्यानंतर श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सर्वसामान्यांप्रमाणे मंत्री बच्चू कडूंनी केला लोकलनं प्रवास!

महत्वाच्या बातम्या- 

“शिवसेनेनं तत्व बाजूला ठेऊन काय काय मॅनेज केलंय हे जाहीर करावं”

सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

“आंबे कसे खाता याऐवजी रात्री शांत झोप कशी लागते हे विचारा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या