“घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो”
मुंबई | महाराष्ट्रातून अनेक गोष्टी हलविण्याचे डाव सुरू आहेत. पण 2024ला शिवसेना दिल्लीत बसेल आणि सगळं थांबवेल, असं वक्तव्य राज्याचे पर्यटन मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तर शिवसेना प्रत्येक राज्याला न्याय देईल, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
2024ला शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसेल, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावरून माजी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
2024मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच असं आदित्य ठाकरे म्हणाले. घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवायचा विचार दिसतो, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे.
दरम्यान, गजानन किर्तीकर म्हणाले की मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण 2024मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच, असा पुनरूच्चार आदित्य ठाकरे यांनी केला होता. या वक्तव्याचा आधार घेत सदाभाऊ खोत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच – आदित्य ठाकरे
घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) February 27, 2022
थोडक्यात बातम्या-
“… त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री महोदय अजून किती सहन करायचं”
MSEB विरोधात शेतकरी आक्रमक, अज्ञातानं सबस्टेशन पेटवलं
“उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, विचार करा”
‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
“…तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”
Comments are closed.