बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाच्या”

सांगली | हिंदु पुरोहितांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) चांगलेच चर्चेत आले. विरोधकांवर केलेल्या खरमरीत टीकेमुळे अमोल मिटकरींवर अनेकदा टीका झाली आहे. अमोल मिटकरींनी सातत्याने विरोधकांवर केलेल्या टीकेवरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मिटकरींवर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी हा तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचं फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या टीकेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काही काळ यांचं नाचगाणं चालेल. फड मालकाला चांगलं वाटत असेल पण तोडा फोडा अशी नीती राष्ट्रवादीची आहे. अनेक नेते प्रत्येक समाजाचे घ्यायचे आणि जातीयवाद करायचा. तर दुसरीकडे शरद पवार सर्वांचे तारणहार आहेत हे समाजाला समजावण्याचं काम राष्ट्रवादीचे नेते करतात, असा टोला खोत यांनी लगावला आहे.

दरम्यान, आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणजे खाकी आणि खादीची युती आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तर राणा दांपत्यावर व शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यावरून, हे राज्य म्हणजे गुंडाराज्य आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

दादागिरी करून याल तर ती मोडून काढू, दादागिरी कशी मोडायची हे…- उद्धव ठाकरे

“…म्हणून प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबले”

“माझं सरकार बरखास्त झाल्याचं समजलं त्यानंतर मी…”

सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘या’ शिवसेना नेत्याला अटक

मुंबई उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला झाप झाप झापलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More