बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उघड दार देव आता उघड दार देव”, सदाभाऊ खोत यांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना तुफान फटकेबाजी केली होती. तर 2024 साली सुद्धा ठाकरे सरकार सत्तेत राहाणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हटले होते.

2024 साली महाविकास आघाडी सरकारच सत्तेत राहाणार या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेनंही ठरवलंय 2024 मध्ये बदल हवाच, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

‘महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi) कुशासन ते भाजपचे सुशासन. जनतेलाही बदल हवाच. उघड दार देव आता उघड दार देव,’ असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, 2024 साली महाविकास आघाडी सरकारच येणार आणि उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असणार, हे शरद पवार (Sharad Pawar) यांनी खासगीत सांगितलं असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

Omicron ला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज? अहवालातून आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Omicron | राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

“महाराष्ट्रातील मुस्लीम तिरंगा हातात घेऊ शकत नाही का?”

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, ‘या’ तारखेला होणार सामना

“दादा बघा, दादा बघा…अरे दादाला इथली अंडी पिल्लं माहितीये”, अजित पवारांची टोलेबाजी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More