“शरद पवारांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं, त्यांचं नाव आगलावे करा”
सोलापूर | राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. सध्या अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगत असताना रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केलेलं नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावण्याचं आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचं काम केलं आहे, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचंच काम केलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्याचं आडनाव पवार ऐवजी आगलावे असं करावं, अशी खरमरीत टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे. तर हे राज्य इतके होरपळून निघाले आहे की ते आता थांबले पाहिजे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीही शरद पवारांवर टीका केली होती. सदाऊभाऊ खोत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, यापूर्वीच खोत यांनी आणखी एकदा शरद पवारांवर घणाघाती टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Weather Update: येत्या पाच दिवसांत ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा
रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनचं कोट्यवधींचं नुकसान, ‘ही’ आकडेवारी समोर
“भाजपच्या काळ्या जादूचा आमच्यावर प्रभाव पडणार नाही”
“सुशिक्षित हिंदू मुलीच मुस्लिम मुलांना पळवून नेतात”
महाराष्ट्रावर आणखी एक संकट, पुढचे पाच दिवस महत्त्वाचे
Comments are closed.