महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 सोलापूर

शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं- सदाभाऊ खोत

सोलापूर |  शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ ते सोलापुरात बोलत होते.

शरद पवार येरवड्यामध्ये गेले तर त्यांनी गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच राहावं. तुरुंगात गेल्यानंतर आघाडीच्या काळात आमच्यावर गुन्हे करणाऱ्या पवारांना आमचं दुःख काय असतं हे कळेल, असं खोत म्हणाले आहेत.

शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आमच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कितीतरी गुन्हे दाखल केले. ते सगळे खोटे गुन्हे होते. एकदा मी येरवड्यात असताना माझ्यावर कराडमध्ये टँकर फोडीचा गुन्हा दाखल केला. आता पवारांनी येरवड्यामध्ये जाऊन रहावं म्हणजे त्यावेळचं आमचं दुख: त्यांना कळेल, असं खोत म्हणाले.

दरम्यान, खोत यांच्या टीकेला राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या