बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमचं सरकार येणार हाय, तवा तुम्हाला सुट्टी नाय”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेते राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) तसेच केंद्रीय मंत्र्यांनी देखील असा दावा केला होता. अशातच आता माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडीवर टीका करत मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्य सरकारचा भ्रष्ट कारभार आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. दिवसभर गोळा झालेला पैसा संध्याकाळी तिघे भाऊ म्हणजेच तिन्ही पक्ष एकेक रुपया वाटून खात आहेत. या सरकारमध्ये मंत्री, अधिकारी, आमदार पैसे हाणतायेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

ठाकरे सरकारने शेतकऱ्याचे हाल केले आहेत. कोण काही बोललं की लगेच सरकार त्यावर कामात अडथडा निर्माण केल्याचा आणि तडीपाराचा गुन्हा दाखल करत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर आमचं सरकार येणार हाय, तवा तुम्हाला सुट्टी नाय, हे ध्यानात ठेवा, अशा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान,सरकार म्हणतंय बिल भरा बिल भरा नाही तर वीज ताेडू, हे असं वागणं बर नव्हं, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे. आमचं सरकार आलं तर वीज बिल माफ करणार, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

योगी सरकारचा रंगारंग कार्यक्रम! मोदींच्या दौऱ्याआधी एका रात्रीत मस्जिदीचा रंग बदलला

Covishield की Covaxin? ओमिक्राॅनवर कोणती लस प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात…

‘…तोपर्यंत निवडणुका नकोच’; राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काय सांगता! फक्त 3 मिनिटात तब्बल 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More