मुंबई | सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या उद्घाटनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजपकडून सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका करण्यात येत आहे. सांगलीतील स्थानिक लोकप्रतिनीधींच्या नावाच्या समावेशावरून वाद वाढला आहे.
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकावर टीका केली आहे. सांगलीतील कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नकोत, अशी भूमिका या नेत्यांनी घेतली आहे.
आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटनं केली आहेत कंटाळा आला नाही का?, असा सवाल खोत यांनी पवारांना विचारला आहे. आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार, असं खोत म्हणाले आहेत. कितीही पोलीस बळाचा वापर केला तर उद्घाटन होणार, असं खोत म्हणाले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण देण्यात आले नसल्यानं भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
The Kashmir Files करमुक्त करण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात…
‘जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मी नाही तर…’; एलोन मस्कचं मोठं वक्तव्य
RRR Day 2 Collection! दुसऱ्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
“…अन् मी बसल्या बसल्या अजित पवारांना पत्र लिहिलं”
“उद्धव ठाकरे भाग्यवान माणूस, मला त्यांची कुंडली पहायची आहे”
Comments are closed.