महाराष्ट्र मुंबई

“विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?”

मुंबई | वीजबिले माफ होणार नाही किंबहुना वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

शेतकरी कामगाराचे कंबरडे मोडत चालले आहे मात्र तरीही गेंडयाच्या कातडीच्या सरकारला जाग कशी येत नाही?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे.

विरोधात असताना शेतकरी कामगारांचा मोठा कळवळा आला होता मग आता सत्तेत आल्यावर काय झालं?, असा सवाल खोत यांनी उर्जामंत्र्यांना विचारला आहे.

तुम्ही विरोधी बाकावर बसला होता तेव्हा महापूर आणि दुष्काळाच्या काळात टाहो फोडून सांगत होतात की वीज बिलात सूट द्या किंबहुना माफी द्या आणि आता सत्तेत आल्यावर सांगता की वापरलेल्या विजेचे बील द्यावेच लागेल. तुमचं वागणं म्हणजे जनतेच्या मतांशी प्रतारणा आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपला मस्ती आली आहे आणि त्यांना मी धडा शिकवणारच!”

तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघाला आहे पण…-निलेश राणे

“जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राजू शेट्टींसोबत जाणार नाही”

“शिवशक्ती-भीमशक्ती-भाजपची एकजूट, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली”

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना फडणवीसांचा शिवसेनेला टोला; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या