सदाभाऊ खोत यांनी सुकाणू समितीची खिल्ली उडवली

रायगड | राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी चक्क सुकाणू समितीचीच खिल्ली उडवलीय. भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त खत वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.

राज्य सरकारच्या कर्जमाफीचा विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना फायदाच होईल. मात्र सुकून गेलेल्या समितीसंदर्भात आपल्याला काहीही बोलायचं नाही, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं.