मुख्यमंत्र्यांनी फक्त आदेश द्यावा, हातकणंगलेतून खासदारकी लढवीन!

पुणे | मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवेन, अशी घोषणा कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलीय. दौंड कृषी महोत्सव प्रदर्शनात ते पत्रकारांशी बोलत होते.

खोटं रक्त दाखवणं, पायाला फोड आलेले फोटो दाखवणं हे शेट्टींचं काम आहे, अशा शब्दात त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडलं तसेच हातकणंगलेच्या जनतेला बहुजन खासदार हवा आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 

दरम्यान, शुक्रवारी कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला जाताना सदाभाऊंना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली तसेच त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.