Sadabhau Khot l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेतेमंडळी प्रचार सभा घेत आहेत. अशातच आता जत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या दिग्गज नेत्यांची सभा पार पडली आहे. या दरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? :
या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार आहे. तसेच या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयी करा. तसेच गोपीचंद पडळकर यांना विधानसभामध्ये पाठवायच आहे. तर विरोधक हा कुंभकर्णच्या अवस्थेत गेला पाहिजे असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
याशिवाय शरद पवार यांनी बँका हाणल्या आहेत. तसेच कारखाना देखील हाणाला आहे, पण आता शरद पवारांनी येवढं हाणलं तरी ते भाषणात म्हणतात की, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. तसेच मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा? आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? खोचक असा सवाल भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
Sadabhau Khot l पडळकरांना निवडणुकीत निवडून द्या :
याशिवाय गावातील नागिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे कोणी काम केले आहे तर ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असल्याचं सदाभाऊ खोत म्हणले आहेत. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसवाले नेतेमंडळी हे देवेंद्र फडणवीस यांना का घेरायला लागली आहेत तुम्हाला माहिती आहे का? तर आपण शेतकरी माणसं आहोत. त्यामुळे आपल्या घरात गाय असते. तेच राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे असं खोत म्हणाले आहेत.
तसेच भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर म्हणजे महाराष्ट्रची मुलूख मैदान तोफ आहे. मात्र बाकीच्या लोकांकरता हा जत विधानसभा मतदारसंघ हा शेवटचा असेल, पण माझ्यासाठी हा तर एक नंबरचा मतदार संघ आहे. त्यामुळे जत विधानसभा हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे त्यामुळे गोपीचंद पडळकरांना या निवडणुकीत निवडून द्या असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
News Title – Sadabhau Khot On Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानी मतदारांना शिवीगाळ केली…; भाजपचा हल्लाबोल
भाजपचा उमेदवारच करणार तुतारीचा प्रचार?; ‘या’ नेत्याच्या ट्वीटने खळबळ
लाडक्या बहिणींना अजितदादांचा नवा वादा! रकमेत होणार भरघोस वाढ
सोनं आज स्वस्त झालं की महागलं?, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
राज्यात विधानसभेला मेहुणे-मेव्हण्यात होणार टशन!