सदाभाऊ खोतांवर बलात्काराचा आरोप, महिलेचा नवा व्हिडिओ

मुंबई | सदाभाऊ खोत यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. मी मॅनेज झालेली नाही, माझ्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेण्यात आला, असा आरोप पीडितेनं केला आहे.

माफीनामा लिहिण्याशिवाय पर्याय नव्हता एवढी माणसं त्यावेळी घरात घुसली होती. तेव्हा माझा खूनही झाला असता, असा धक्कादायक खुलासा पीडितेनं केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, “सीआयडीकडून माझी चौकशी होणार, माझ्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या जाणार, असं मला पोलिसांकडूनच सांगितलं जातंय. मात्र पोलीस तक्रार घेणार नसतील तर मी कोर्टात जाणार”, असंही पीडितेनं म्हटलंय. 

पाहा व्हिडिओ- 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या