सांगली | अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात सुरु झालेलं वाकयुद्ध अद्याप सुरूच आहे. आता या वादामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उडी घेत मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे.
अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींना उत्तर दिलं आहे. ते सांगलीत बोलत होते.
आम्ही सगळं केलं पण सामान्य माणसांचे खिसे कापले नाहीत, असा टोला सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींना लगावला आहे.
तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता.
थोडक्यात बातम्या-
“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”
“संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील”
मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!
कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स…
राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सरकारलाच नडला, गुन्हा दाखल झाला पण शिवजयंती साजरी केलीच!