बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ तिघांसाठी सदाभाऊ खोत देवासारखे धावून आले…!

सांगली | सांगली- कोल्हापूर भागात सध्या पूरामुळे अनेक लोक अजूनही पुरात अडकून पडलेत. अशात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सांगलीत 5 दिवसांपासून पुरात अडकून असलेल्या ‘त्या’ तिघांसाठी देवदूत ठरलेत.

वाळवा तालुक्यातल्या बहे गावातल्या रामलिंग बेटावर अनिल बडवे, सुमन अनिल बडवे आणि त्यांची नात मोहिनी कुलकर्णी हे गेल्या 5 दिवसांपासून पुरामुळे या बेटावर अडकून होते.

रामलिंग बेटाकडे जाण्यासाठी बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हेलिकाॅप्टरची मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात होते मात्र ती मिळाली नाही. मग सदाभाऊ खोत या कुटुंबासाठी देवासारखे धावून गेले.

व्हाईट आर्मीच्या लोकांना घेऊन सदाभाऊ स्वत: 3 किलोमीटर नदीच्या प्रवाहाविरूद्ध जाऊन या कुटुंबाला सुखरूप सुरक्षित स्थळी घेऊन आले.

महत्वाच्या बातम्या-

-हरियाणाच्या मुख्यमंत्र्याचं काश्मीरवरून वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

-अजून मी म्हातारा झालेलो नाही- शरद पवार

-शिरूरकरांनी दिलेली मदत घेऊन खासदार अमोल कोल्हे पूरग्रस्तांच्या भेटीला

-ब्रह्मनाळमधील बोट उलटल्याची दुर्दैवी घटना; मृतांच्या संखेत वाढ…

-माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग निवडणुकीच्या रिंगणात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More