बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडून घ्या पण, मतदान भाजपलाच करा”

नांदेड | राज्यातील नांदेड मधील देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू आहे. भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज सुभाष साबणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपचा जाहीर मेळावा पार पडला. भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

अशोक चव्हाण हे भाग्यवान आहेत. सरपंचाचा शिपाई झाला. मुख्यमंत्री होते पण, त्यांनी लाचार होऊन मंत्रिमंडळात सामील झाले. तसेच सरकारमधील लोक नोटा मोजून थकले आहेत. त्यामुळं या निवडणुकीत पैशांचा मोठा वापर होणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा. मतदान करा म्हणाले की खोट्या शपथा घ्या आणि मतदान साबणेंना करा, असं आवाहन खोत यांनी मतदारांना केलं आहे.

विधानसभा गाजवणारा नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे. मला खात्री आहे की पंढरपूरनंतर देगलूरमध्ये क्रांती होणार आहे. तीन पक्षाचे अलिबाबा आणि चाळीस चोर मतदान मागण्यासाठी येतील. त्या सर्वांनी पीर विम्याचे चार हजार कोटी वाटून खाल्ले आहेत. त्यामुळं अतिवृष्टीनंतर हे सरकार आपल्याला काय देणार?, मला खात्री आहे की, हे सरकार काहीच देणार नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम खातं आहे. त्यांच्याच जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शेतकऱ्यांना मदत द्या आणि मत मागा, नाहीतर घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा, असं नको व्हायला, असा सल्लाही खोत यांनी मतदारांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

टी-20 विश्वचषकाआधी या खेळाडूची सर्व संघांना धास्ती; गेल, विराटला मागे टाकत केलाय ‘हा’ भीम पराक्रम!

राज्य लोकसेवा आयोगाकडून 2021 च्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध, ‘या’ तारखेला होणार परीक्षा!

‘शिवसैनिक रडणारा नाही तर…’; सेनेला रामराम करत भाजपवासी झालेल्या साबणेंवर राऊतांचं टीकास्त्र!

ब्रेकिंग | पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी

आर्यनला ज्या पार्टीतून उचललं ‘त्या’ पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More