मुंबई | काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवलं होतं. त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्याचं काम मोदी सरकार करत आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.
सदाभाऊ खोत हे बारामती येथे न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यासाठी काम करण्याचा दावा करता मग शेतकऱ्याचे साखर कारखाने विकत का घेतले? 20 किमीची दोन कारखान्यातील अट काढुन टाका तरच आम्ही तुम्हाला शेतकरी नेते म्हणु, असं खोत म्हणाले.
शेतकऱ्याला लुटायचा धंदा बंद करा, तरुण पिढी आता शिकलेली आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केलीये.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! पोलिओ डोसऐवजी पाजलं सॅनिटायझर, 12 बालके रुग्णालयात
“आम्ही निवडणुकीचा फारसा विचार करत नाही, सरकारने जी वचनं दिली पुर्ण करून दाखवणारच”
अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
“किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचं?, आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे”