“बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार”
बारामती | बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे. हा माणूस ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असणार. एवढा बिलंदर माणूस राजकारणात पाहायला मिळणार नाही, असं म्हणत
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे.
सांगलीतील आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी खोत बोलत होते.
दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर सर्वच स्तरांतून तिच्यावर टीकेचा भडीमार झाला.
महाविकास आघाडीतील पक्षांसह भाजपमधील काही नेत्यांनीही तिला समज दिली आहे. अशात आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. ‘केतकीचा मला अभिमान आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिची पाठराखण केली.
थोडक्यात बातम्या-
हसिना पारकरच्या मुलाचे ईडी चौकशीत डॉन दाऊद इब्राहीमबाबत धक्कादायक खुलासे!
शिवसेनेनं संभाजीराजेंना डावल्यानंतर मराठा संघटना आक्रमक; दिला गंभीर इशारा
प्रेयसीसोबत सेक्स करताना 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, तपासातून धक्कादायक माहिती समोर
औरंगाबादेत मोर्चा लोकल लोकांनी काढला- पंकजा मुंडे
‘…तर आताच राजीनामा देतो’; उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.