बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर अजून काय अपेक्षा करणार”

मुंबई | राज्यात सध्या चालू असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून (ST Employees Strike) जोरदार राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Government) आणि विरोधी पक्ष भाजप (Party Opposition BJP) यांच्यात कलगीतूरा रंगला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी पगारवाढ देऊनही जे कर्मचारी संप करत आहेत त्यांच्यावर कारवाई करायला सुरूवात केली आहे. या कारवाईवरूनच माजी मंत्री सदाभाऊ खोत (Former Minister Sadabhau Khot) यांनी सरकारवर जहरी टीका केली आहे.

गेल्या एका महिन्यापासून चालू असणाऱ्या संपावरून राज्यात वातावरण गंभीर झालं आहे. सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात विलीनीकरण सोडून सर्व मागण्यांवर एकमत होतं आहे. पण कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. परिणामी सरकारनं कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करायला सुरूवात केली आहे. लातूर आगारातील एक वाहक महिला आपल्या प्रसुतीसाठी रजेवर आहे पण तिला सरकारनं निलंबनाची नोटीस बजावल्यानं सध्या नवा वाद निर्माण झाला आहे.

निव्वळ मूर्खपणा लावला आहे, बिनडोक लोक सत्तेवर बसल्यावर अजून काय अपेक्षा करणार, अशी खरमरीत टीका सदाभाऊ खोत यांनी सरकारवर केली आहे. लातूर डेपो मधील सारिका लाड या वाहक म्हणून महामंडळात सेवा देत असून त्यांनी प्रसुतीसाठी रजेवर जाण्यासाठी अर्ज केलेला होता. परंतु या बिनडोक सरकारने या महिलेला आज निलंबनाची नोटीस बजावली आहे, अशी टीका खोत यांनी केली आहे.

दरम्यान, एसटी कर्मचारी कामावर आले नाहीत तर आम्हाला कारवाई करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरणार नाही, असं अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे. एसटी संपामुळं सध्या सामान्यांचं प्रचंड हाल होत आहेत.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या 

शरद पवार यांच्यासोबत क्रिकेट सामना पाहण्याची संधी, रुपाली चाकणकर म्हणतात…

एसटी कर्मचाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई होणार, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

लवकर वसतिगृहे चालू करा! स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कंगनाला शेवटी माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी अन्…; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More