जळगाव | देशात इंधनाच्या दराने उच्चांक गाठला असताना वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. महागाईविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देशातील महागाईचं समर्थन केलं आहे.
‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानानिमित्त सदाभाऊ खोत जळगाव येथे होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी महागाईचं समर्थन केलं. पेट्रोल-डिझेल आणि एकंदर वाढत्या महागाईवर प्रश्न विचारण्यात आला असता सदाभाऊ खोत हे महागाईचं समर्थन करताना दिसले.
कुठला पक्ष महागाईच्या समर्थनाचं धाडस करेल? कोण धाडस करेल? पण मी केलं. कशाची महागाई आली. हो, 20 हजारांचं सोनं 50 हजार तोळं झालं. तरी लोक घेतातच ना. महागाई झाली तरी लोक दारू पिणं सोडतात का? कांदा डाळीच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल. या महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
दरम्यान, महागाईचं समर्थन करण्याचं धाडस कोण करेल? असं म्हणत खोत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येणार हे बघावं लागेल.
थोडक्यात बातम्या-
“NIA कारवाईतून दिग्गज नेत्यांची नाव उघड होणार”
मुंबईचं टेन्शन वाढलं! फाॅर्मात असलेला हुकमी एक्का स्पर्धेबाहेर
चक्रीवादळाचा ‘या’ तीन राज्यांना बसणार फटका, अलर्ट जारी
“मी मुंबईचा मराठी माणूस, हे शहर आमच्या बापाचं आहे”
संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव
Comments are closed.