बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तिला मानलं पाहिजे’; सदाभाऊ खोत यांच्याकडून केतकी चितळेच्या पोस्टचं समर्थन?

सांगली | अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद(Sharad Pawar) पवारांवर अत्यंत वाईट शब्दात टीका करणारी पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी तिला अटक (Arrest_ करण्यात आलीये. केतकीच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे.

अनेकांनी केतकीला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. अशात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

केतकी चितळे ही कणखर आहे, तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. तिने न्यायालयात वकील न देता स्वत:च स्वत:ची बाजू मांडली, त्यामुळे तिला मानावं लागेल, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

तुम्ही केलं की पाटलाच्या पोराने केलं आणि दुसऱ्याने केलं की कुणब्याच्या पोराने केलं, हे धंदे बंद करा, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ

खळबळजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरात सापडला मृतदेह

‘वज़नदारने हल्के को…’; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

राज्यातील ‘या’ 9 जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! SBI चा ग्राहकांना मोठा झटका, आता… 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More