महाराष्ट्र मुंबई

कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा- सदाभाऊ खोत

मुंबई | कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचं म्हणत माजी राज्य कृषीमंत्री आणि रयत क्रांती संघटना अघ्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उद्यापासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

कांदा निर्यातबंदी निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

5 जूनला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. त्यानंतर शेतकरी आनंदी झाला होता. मात्र, ‘एक देश एक बाजारपेठ’ अशी केंद सरकारची घोषणा अवघ्या 3 महिन्यांत हवेत विरली, ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय.

सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अमान्य आहे. शेतकऱ्यांचा हा काळ संकटाचा आहे. या काळात त्यांना मदत द्यायची वेळ आली आणि त्यांच्या तोंडाशी आलेला घास सरकारनं काढून घेतला आहे, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

मराठा आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल- देवेंद्र फडणवीस

तज्ज्ञांशी संवाद सुरू असून मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करू- उद्धव ठाकरे

चिंताजनक! राज्यात आज 23 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या