Top News महाराष्ट्र मुंबई

“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा”

मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्याला शेतकरी विरोध करत आहेत. तर महाराष्ट्रातूनसुद्धा विरोध केला जात आहे. यामध्ये शेतकरी स्वाभीमानी संघटेनेचे नेचे राजु शेट्टी यांनीही कृषी कायद्यांवरून केंद्रावर जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शेट्टींवर निशाणा साधला.

राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस आणि गोड चहा घ्यायचा तर अन दुसरीकडे शेतकरी आंदोलनाला विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका घ्यायची. असं काहींचे धोरण असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ठाण्यात ते बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो असं खोटे बोलून फक्त आमदारकी मिळाली यासाठीचे प्रयत्न शेतकऱ्यांना दिसत आहे. एका बाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं हे उद्योग बंद करा, असा उपरोधिक टोलाही खोत यांनी लगावला.

दरम्यान, नवीन कायद्यांमुळे शेतकरी आणि बाजारपेठांना फायदा होणार असल्याचं खोत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

देशांतर्गत वापरासाठी पुण्याहून सिरमच्या कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच रवान

नितेश राणे हे पहिले हँग ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात- अब्दुल सत्तार

वरुण द्या, खालून द्या…, मनात असेल त्यांना सुरक्षा द्या- देवेंद्र फडणवीस

थोरली CA तर धाकटी UPSC उत्तीर्ण, भाजप खासदार ओम बिर्ला यांचं शिक्षण किती?

तानाजी चित्रपटाला एक वर्ष पुर्ण! शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद- शरद केळकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या