सांगली | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तुम्ही जास्त खोटं बालू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल तुम्ही जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे होऊन गेलात, अशी बोचरी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
बाजार समितीच्या मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि हेच शरद पवार दिल्लीत जाऊन शेतकरी आंदोलनाला पाठींबा देतात, असं खोत यांनी म्हटलं आहे. सांगलीत माध्यमांशी ते बोलत होते.
पवारांचं जास्त मनावर घेऊ नका कारण ते नेहमी उलट बोलत असता. जेव्हा ते सांगतात की सुर्य इकडून उगवणार त्यावेळी दुसऱ्या बाजुने उगवतो. पवारांनी तसं त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं असल्याचं सांगत खोत यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेला सुरूवात 24 डिसेंबरल होणार असून 27 डिसेंबरला सांगता होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
अंबानी पुत्राचा नामकरण सोहळा; आकाश-श्लोकाच्या मुलाचं ठेवलं ‘हे’ नाव
त्रास होत असल्यास शिवसेना सोडून भाजपमध्ये या; राजन यांना खुलं निमंत्र
…तर फडणवीस-मोदींशी चर्चा करून तोडगा काढू’; ‘या’ माजी मंत्र्याने अण्णांना केली विनंती
कोरोनाचा मोठा फटका; रिंकू राजगुरु अडकली या संकटात
…तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील- राहुल गांधी