महाराष्ट्र सांगली

हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत

Photo Credit- Facebook/ Sadabhau Khot, Uddhav Thackarey

सांगली | माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवजयंतीला घातलेल्या निर्बंधांवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

हे सरकार दारुडं सरकार आहे. कोरोना काळात या सरकारने दारूतून जास्त कर मिळतोय म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

कोरोना वाढला आहे असं सरकार आता सांगत आहे. मात्र 6 महिने कोरोना कुठे झोपला होता का? 6 महिने तुम्ही चाचण्याच घेतल्या नाहीत का? आता अधिवेशन जवळ आले आहे. त्यात विरोधी आमदार जनतेचे प्रश्न मांडणार, आपल्याला तोंड द्यावं लागणार म्हणून राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे का?, असे सवाल सदाभाऊ खोत यांनी सरकारला विचारले आहेत.

दरम्यान, याचवेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींवरही निशाणा साधला. अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की दारु विकली म्हणे. मी म्हणतोय गांजाही विकत होतो. तू येतोस का चिलीम लावायला, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींना उत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात आता मास्क न घातल्यास ‘इतका’ दंड भरावा लागणार!

आम्ही दारुच नाही, गांजाही विकला असेल, पण…- सदाभाऊ खोत

शर्मिला ठाकरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…

शरद पवार यांच्या सूचनेनंतर पुण्यातील वशाटोत्सव रद्द!

“52 लोक शरद पवारांना सोडून गेले, एकही आमदार झाला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या