बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराजांच्या घोड्यावर बसून गाढवपणा, या कृत्यानंतर मग बाबरसेना काय करणार?”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. पण या कार्यक्रमातील राजू नवघरेंचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओचा तीव्र निषेध करत विरोधी पक्षांनी नवघरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरही निशाणा साधला आहे.

रयत संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या घटनेचा जाहिर निषेध केला आहे. सदाभाऊ खोत यांनी राजू नवघरे यांच्यासह शिवसेनेवरही जळजळीत टीका केली आहे. शिवसेनेचा बाबरसेना असा उल्लेख करत सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्वीटच्या माध्यमातून खोत यांनी जोरदोर हल्लाबोल केला आहे.

महारांच्या घोड्यावर बसून गाढवपणा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्या या कृत्यावर आता बाबरसेना काय करणार? असा घणाघात खोत यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीच्या या आमदाराला चपलेने मारणार की भवनवर बोलून फुलाचा हार घालणार? असा संतप्त सवालही सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल राजू नवघरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाला जाणीवपूर्वक हे षडयंत्र करून बदनाम केलं जात असल्याचा आरोप नवघरे यांनी केला आहे. पण सगळ्याच विरोधी पक्षांनी यावेळी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आहे. अनेक नेत्यांनी या घटनेवरून निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! खाद्य तेलाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“महिला आयोगाला अध्यक्ष मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका”

“पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ”

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री मात्र कायम

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय, इतर देशांनी कर्ज नाकारल्याने निघणार दिवाळं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More