बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आम्ही शेतकरी गेलो सरणावर अन् माझ्या सरणावरची फुले मंत्र्यांच्या अंगावर”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार समारंभ कार्यकर्त्यांनी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. याच कार्यक्रमावरून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी राज्यातील अनेक नेते राज्य सरकारकडे नुकसाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर, अन् माझ्या सरणावरची फुले चला उधळुया मंत्र्यांच्या अंगावर, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे.

राजाने मारले आणि पावसाने झोडपले. तर दाद कुणाकडे मागायची. अशीच अवस्था सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झाली आहे. मायबाप सरकार आता आश्वासन नाही तर थेट मदत द्या. माझ्या शेतकरी बांधवांना धीर द्या, अशी मागणी देखील सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसानं थैमान घाललं आहे. अनेक लोकाचं अतोनात नुकसान झालं आहे. मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी विरोधी पक्षांनी सरकारकडे केली आहे.

पाहा व्हिडीओ-

चक्रिवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर…!
अन् माझ्या सरणावरची फुले चला उधवुया मंत्र्याच्या अंगावर….!!#मराठवाडा #अतिसुष्टी @Jayant_R_Patil @BansodeSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/Mv5vsUMrEm

थोडक्यात बातम्या-

“नेमका ‘हाच’ फरक आहे भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेतला”

‘उसूलो पर आंच आए तो टकराना जरुरी है’; राजीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी सोडलं मौन!

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

‘जर एखादं गटारातून बाहेर येत नाल्यात पडत असेल तर…’; कन्हैया कुमारच्या पक्षांतरावर भाजपची टीका

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More