बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही”

अहमदनगर | ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे. आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, अशी खोचक टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. खोत यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली.

सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली व तब्बेतीची विचारपुस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी दूध दरवाढ, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

सरकारकडे पाहिलं तर आपला पक्ष, आपला आर्थिक संच कसा आणि कोणत्या मार्गाने वाढवता येईल याची स्पर्धा लागलेली पाहायला मिळतेय. विकासासाठी मात्र हे सरकार काही करत नाही. राज्यात ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना पीककर्ज, खत, बी बियाणे मिळत नाही. मराठा समाजाला न्याय देण्याची नियतही या सरकारची नाही, असा गंभीर आरोपही खोत यांनी ठाकरे सरकारवर केलाय.

राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही. युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये नुकसान भरपाई देऊ असं म्हणाले होते. मात्र, उद्धव ठाकरे आता घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. हे सरकार कोरोनाचं भूत घेऊन सर्वत्र हिंडत आहे. मोर्चे, आंदोलनावर बंदी घातली जात आहे. खरं तर ठाकरे सरकारलाच कोरोना झालाय, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा…- गोपीचंद पडळकर

अनिल अंबानींना मोठा झटका; अडचणी वाढण्याची शक्यता

…म्हणून कोरोना मृतांच्या कुटुंबियांना आम्ही 4 लाख देऊ शकत नाही- केंद्र सरकार

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करणं आवश्यक – अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More