Top News

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही- सदानंद मोरे

Loading...

अहमदनगर | प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरकर यांच्या वादग्रस्त वक्यव्यावरुन जो वाद सुरु आहे तो काही शमन्याचं नाव घेईना. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. या वादावर आता संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भाष्य केलंय.

महाराष्ट्रात कीर्तन, प्रवचनाची परंपरा मोठी आहे. महाराष्ट्राच्या परंपरेत इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही. त्याचबरोबर त्यांचे विनोदही कमी दर्जाचे असतात, असं म्हणत सदानंद मोरे यांनी इंदोरीकरांवर टीका केली आहे.

इंदोरीकरांवर यापूर्वीच चर्चा व्हायला हवी होती. इंदोरीकरांची कीर्तनं महाराष्ट्राच्या परंपरेत बसत नाहीत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकोबा रायांचा तर आपण इंदोरीकरांसारखा विचार करु शकत नाही. गेली 50-55 वर्षे कीर्तनं ऐकतो. मामासाहेब दांडेकर आणि त्यांच्या आधीच्या कीर्तनकारांची कीर्तनं ऐकली त्यामध्ये असे विनोद कधीच नव्हते, असं सदानंद मोरे म्हणाले आहेत.

दरम्यान, इंदोरकरांच्या किंवा इतर कीर्तनकरांच्या नावापुढे विनोदमूर्ती किंवा विनोदाचार्य असं लिहतात. विनोदाचार्य हे कीर्तनकारांचं विशेषण नाही. त्यांच्या कीर्तनातून महिलांना टार्गेट केलं जातं. स्त्रियांवर केलेले विनोद आणि त्यांना मिळणारी दाद हे आपली अभिरुची घसरल्याची लक्षणं आहेत, असंही सदानंद मोरे म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या”

तृप्ती देसाई तक्रार दाखल करण्यासाठी आज नगरमध्ये जाणार!

महत्वाच्या बातम्या-

भाजप कार्यकर्ते आहत का? सगळे बीळात शिरले- नवाब मलिक

तृप्ती देसाई, नगरमध्ये येऊन दाखवाच; शिवसेनेच्या आष्टेकरांचं आव्हान

इंदुरीकरांनी 25 वर्षात अनेक चुकीच्या चालीरीती बंद केल्या- बाळासाहेब थोरात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या