मुंबई | मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सदावर्तेंनी केली मोठी मागणी
शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालवलं आहे. परत एकदा मनोज जरांगे यांनी हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतं, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तजित केलं आहेत, असं गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणालेत.
रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे यामागे राजकीय हेतू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे, असं गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील आक्रमक
मनोज जरांगे (Gunratna Sadavarte) यांनी आपल्या भाषणामध्ये आक्रमक होत आंदोलनस्थळ सोडत अंतरवाली येथून चालायला सुरूवात केली. मनोज जरांगे (Gunratna Sadavarte) पायी सागर बंगल्याच्या दिशेने आपण जाणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र समाजाच्या बांधवांनी त्यांना विनंती करून गाडीत बसवलं. कारण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून उपोषण करत असल्यानं जरांगे यांची प्रकृती खालावत चालली आहे.
पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे, असं गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) म्हणाले.
सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले
आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…
मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना!
वाघामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत!
“माझ्या सलाईनमध्ये विष टाकून मला मारण्याचा प्लॅन…”; जरांगेंच्या आरोपाने खळबळ