मुंबई | राज्यासह देशात खळबळ माजवणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात नवी घडामोड घडत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पाठोपाठ आता त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील या मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत.
जयश्री पाटील या सदावर्तेंच्या अटकेनंतर न्यायालयात त्यांच्या वकील होत्या. पण त्यांना अटक करण्यात येणार असल्याचं कळताच त्या गायब झाल्या आहेत. जयश्री पाटील यांना असलेलं पोलीस संरक्षण पाटील यांनी सोडलं होतं. त्यानंतर आता त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत.
बुधवारपासून जयश्री पाटील यांचा फोन देखील बंद आहे. परिणामी त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांना सातारा न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्लॅन तयार करण्यात गुणरत्न सदावर्तेंसह जयश्री पाटील यांचा देखील हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या –
गायिका आशा भोसलेंचा मुलगा दवाखान्यात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
“…तर कारवाई केली जाईल”; रुपाली ठोंबरेंची थेट राज ठाकरेंवर टीका
…अन् भर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा माफीनामा वाचून दाखवला
“…म्हणून भाजप ठाकरे सरकारवर दबाव आणतंय”, पवारांनी सांगितलं कारण
“मनसे आता उद्धव ठाकरेंचे वडीलही हायजॅक करणार का?”
Comments are closed.