बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सदाभाऊंच्या जीवाला धोका आहे असं वाटत नाही पण..’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे सोलापुर दौऱ्यावरुन परत येत होते. त्यावेळी अचानक अशोक शिनगारे या व्यक्तीने सदाभाऊ खोत यांची गाडी अडवत “2014 च्या लोकसभा निवडणुकी वेळेसची हॉटेलची राहिलेली उधारी द्या मगच जा” अशी वारंवार मागणी केली. यामुळे खोत अस्वस्थ झाल्याच पहायला मिळालं. हा व्हिडिओ देखील प्रंचड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.

हॅाटेल मालक आणि सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या बातचीतीनंतर सदाभाऊ खोत यांना ‘वाय'(Y) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पैशाची मागणी करणारा हॅाटेल मालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असुन जिवाला धोका असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला होता.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला. धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणाची मी पोलिंसाकडे तक्रार केली. तसेच त्या हॅाटेल मालकाचे सत्य पत्रकार परिषद घेऊन उघड करु असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

दरम्यान, त्यांच्या जीवाला काही धोका आहे असं वाटत नाही. त्यांच्या मागणीवरुन त्यांना सुरक्षा देण्यात आली असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

थो़डक्यात बातम्या 

“शिवसेनेचीच भूमिका घेत इतर प्रादेशिक पक्ष स्थापन झाले”

नीरज चोप्राचा आणखी एक अप्रतिम पराक्रम, फिनलँडमध्ये जिंकले सुवर्णपदक

Monsoon Update| राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी

एकनाथ खडसे आणि राम शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More